Sunday, September 23, 2012

डाव्या व उजव्या सोंडेचा गणपती

डाव्या व उजव्या सोंडेचा गणपती 

प्रत्येक गणेशभक्त गणपती घेत असताना डाव्या व उजव्या सोंडेचा गणपती पाहून घेतो. त्यामागचे शास्त्र काय ते आपण या लेखात पाहू. डाव्या सोंडेच्या गणपतीकडे पहिल्यास चांगले वाटते. असा एक समज आहे, की सोंडेचे टोक उजवीकडे असलेली मूर्ती म्हणजे उजव्या सोंडेची मूर्ती आणि सोंडेचे टोक डावीकडे असणारी मूर्ती म्हणजे डाव्या सोंडेची, पण हे चूक आहे. सोंडेचे सुरवातीचे वळण कोणत्या बाजूकडे आहे. यावरून ठरवावे. गणेशमूर्तीतील सोंडेचे पहिले वळण जर उजवीकडे असेल व सोंडेचे तोंड डाव्या बाजूकडे वळलेले असेल, तरीही ती मूर्ती उजव्या सोंडेची आहे, असे समजावे.
उजवी सोंड :
उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती म्हणजे दक्षिणाभिमुखी मूर्ती. दक्षिण म्हणजे दक्षिण दिशा किंवा उजवी बाजू. दक्षिण दिशा यमलोकाकडे नेणारी, तर उजवी बाजू सूर्यनाडीची आहे. यमलोकाच्या दिशेला जो तोंड देऊ शकतो तो शक्‍तिशाली असतो. सूर्यनाडी चालू असलेला तेजस्वीही असतो.दक्षिणेला असलेल्या यमलोकात पाप- पुण्याची छाननी होते. म्हणून ती बाजू नकोशी वाटते.मृत्यूनंतर जशी छाननी होते, तसे मृत्यूपूर्वी दक्षिणेकडे तोंड करून बसल्यास छाननी होते.दक्षिणाभिमुख मूर्तीची पूजा नेहमी सारखी केली जात नाही. अशा मूर्तीची पूजा कर्मकांडातील पूजाविधीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून केली जाते. त्यामुळे सात्विकता वाढते व दक्षिणेकडून येणाऱ्या रजलहरीचा त्रास होत नाही.
डावी सोंड :
डाव्या सोंडेचा गणपती म्हणजे वाममुखी गणपती. वाम म्हणजे डावी दिशा किवा उत्तर बाजू. डाव्या बाजूला चंद्रनाडी आहे ती शीतलता देते. उत्तर बाजू आध्यात्माला पूरक आहे. आनंददायी आहे. म्हणून बहुधा वाममुखी गणपती पूजेत ठेवतात. याची पूजा नेहमीच्या पद्धतीने केली जाते.
डाव्या व उजव्या सोंडेचे महत्त्व पहिल्यानंतर आता गणेश पूजामध्ये पाहू वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट वस्तू.
1) दुर्वा : पूजनात दुर्वा विशेष महत्त्वाच्या आहेत. दू + अवम्‌ दू म्हणजे दूर असलेले व अवम्‌ म्हणजे जवळ आणते ते दूर असलेले गणेश पवित्रकांना जवळ आणतात. दुर्वा कोवळ्या असाव्यात दुर्वाना3,5, 7 अशा विषम संख्यांच्या पात्या असाव्यात. चेहरा सोडून सर्व गणपती दुर्वानी मढवावे. दुर्वाच्या वासाने गणपती पवित्रके आकर्षित होतात. वास टिकून राहावा म्हणून दुर्वा दिवसातून तीनदा बदलाव्या.
2) शमी पत्री : शमीमध्ये अग्नीचा वास आहे. पांडवांनी आपली शस्त्रे तेजस्वी राहावी म्हणून शमीवृक्षाच्या ढोलीत ठेवली.
3) मंदाराची पत्री : मंदराची फळे पांढरी असतात औषधात पारा जसे रसायन तसे मंदार हे वानस्पत्य रसायन आहे.
4) लाल वस्तू : गणपती वर्ण लाल. म्हणून लाल फुल, तांबडे वस्त्र, रक्‍तचंदन वापरतात. लाल रंग वातावरणातील पवित्रके मूर्तीकडे जास्त आकृष्ट होतात. मूर्ती जागृत व्हावयास मदत होते, पण गणपतीला लाल रंग आवडतो, असे सांगितले जाते. माहीत नसल्यामुळे.
5) मोदक : 21 दुर्वाप्रमाणे 21 मोदक नैवेद्य दाखवतात. मोदक म्हणजे आनंद. आनंदप्रदान करणारी शक्‍ती. मोदक ज्ञानाचे प्रतीक आहे. मोदकाच्या टोकाप्रमाणे आपले ज्ञानसुद्धा थोडे आहे, असे वाटते पण अभ्यास करू लागल्यावर समजते की खूप मोठे आहे. मोदक गोड तसाच ज्ञानाचा आनंदही गोड असतो

No comments:

Post a Comment