Thursday, September 6, 2012

स्वयंरोजगार म्हणजे काय

शिक्षणानंतर सर्वच जण नोकरीच्या शोधात असतात पण  पुष्कळदा तुम्हाला तुमच्या शैक्षणिक योग्यतेची नोकरी मिळत नाही. अशा परिस्थितीत स्वयंरोजगार हा एक चांगला पर्याय ठरू  शकतो.  स्वयंरोजगार या शब्दाचा अर्थ स्वतःच  स्वतःसाठी  रोजगार उपलब्ध करणे आणि त्याद्वारे अर्थार्जन करणे असा होतो. नोकरी न करता स्वयंरोजगाराचा मार्ग       पत्करणा-यांची  खरेतर खूप कमी आहे. याचे एक कारण म्हणजे समाजामध्ये स्वयंरोजगाराकडे पाहण्याचा दृष्टीकोन तितकासा सकारात्मक नाही.  त्यामुळे आणि योग्य माहिती अभावी आजही  स्वयंरोजगारा पेक्षा नोकरीलाच प्राधान्य दिले जाते.
 खरे तर योग्य मार्गदर्शन आणि कठोर परिश्रमांची जोड मिळाल्यास  स्वयं रोजगाराच्या माध्यमातून नोकरीपेक्षा कितीतरी जास्त आर्थिक विकास साध्य करणे शक्य आहे.  याशिवाय  स्वयं रोजगाराच्या माध्यमातून स्वतःबरोबरच इतरांसाठीही रोजगाराची संधी निर्माण  करणे शक्य आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या आर्थिक विकास सोबतच इतरांच्याही आर्थिक विकासास हातभार लावू शकाल. म्हणून  कुठलाही न्यूनगंड  न बाळगता स्वयंरोजगाराचा मार्ग अवलंबण्यात काहीच गैर नाही. स्वाभिमानाने स्वतःचा आर्थिक विकास साधायचा असेल तर स्वयंरोजगारासारखा दुसरा चांगला मार्ग नाही.
स्वयं रोजगार

चरितार्थ चालवणे यासाठी पैसे कमावणे आवश्यक असते. पैसे मिळवण्यासाठी माणसाला नोकरी करणे किंवा आपला स्वत:चा व्यवसाय सुरु करणे क्रमप्राप्त असते. नोकरी मिळवण्यासाठी माणसाला  आवश्यक शिक्षण किंवा कौशल्य असेल तर त्याला नोकरी मिळू शकते. नोकरी टिकवण्यासाठी  त्याला आपल्याला नेमून दिलेले काम याचाच विचार करावा लागतो. त्याव्यतिरिक्त त्याला इतर गोष्टींकडे लक्ष घालण्याची गरजा उरत नाही. स्वयंरोजगारासाठी मात्र कच्च्या मालापासून अंतीम विक्री पर्यंत त्याला स्वत:लाच लक्ष घालावे लागते किंवा वेगवेगळ्या कामासाठी आवश्यक कौशल्य असलेली माणसे पगारी नोकरीवर ठेवावी लागतात.
कोणत्याही स्वरूपाचा स्वयंरोजगार सुरु करण्याआधी त्या व्यक्तीला किमान काही वर्षांचा अनुभव असणे आवश्यक ठरते. आपण ज्या स्वरूपाचा व्यवसाय सुरु करणार आहोत त्या व्यवसायाचा संपूर्ण अभ्यास आवश्यक ठरतो. त्याचप्रमाणे आपण जो व्यवसाय निवडणार आहोत त्याचा कच्चा माल कोठे उपलब्ध होईल याचप्रमाणे अंतीम ग्राहक कोठे आहे याचीही माहिती असणे आवश्यक असते. नोकरी करतांना नेमून दिलेला तेवढाच पगार मिळू शकतो परंतू व्यवसायातून अधिक जोखीम पत्करली तर अधिक फायदाही मिळू शकतो.
स्वयंरोजगारासाठी
कोणताही व्यवसाय हा त्या त्या व्यक्तीची आवड, त्याला मिळालेली संधी, त्याच्याकडे असणारी भांडवल यावर अवलंबून असते. ज्याला स्वयंरोजगार सुरु करण्याची इच्छा असते त्याने स्वत:च प्रयत्न करायचा असतो. काही काही वेळेला यश मिळते तर काही वेळेला अपयशही पदरी पडते. परंतू व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणतेही रेडीमेड व्यवस्था नसते. काम करता करता शिकणे आणि शिकता शिकता काम करणे हाच त्यातला उत्तम मार्ग असतो.
कधी कधी जो व्यवसाय आपल्याला करावयाचा आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळणे कठीण जाते. अश्यावेळी आपल्याला जो व्यवसाय करावयाचा आहे त्याचे प्रशिक्षण कोठे मिळते याची माहिती मिळवणे आवश्यक असते. प्रशिक्षणाबरोबर प्रत्यक्ष कामाचा अनुभव किती मिळणार आहे याचीही माहिती घ्यावी. काही काही प्रशिक्षणामध्ये प्राक्तीकल त्याचप्रमाणे अपरांटीशिप असते. त्यामध्ये शिकता शिकताच अनुभवही मिळतो त्यामुळे त्याचा प्रत्यक्ष व्यवसाय सुरु करतांना फायदाच होतो.
सरकारतर्फे काही व्यवसायाभिमुख स्वरूपाचे कोर्स शिकवले जातात. त्याच प्रमाणे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यवसाय सुरु करण्यासंबधी मार्गदर्शनही दिले जाते. सरकार तर्फे व्यवसायासाठी कर्ज सुविधा उपलब्ध असतात. त्या कशा मिळवाव्या यासंबंधीची माहितीही दिली जाते. आज काल स्वयंसेवी संस्थाही व्यवसाय करण्यासाठे इच्छुक असणा-या तरुणांना मार्गदशन करतात. काही ठिकाणे व्यवसाय मार्गदर्शन केंद्रही असतात जी आपल्याकडून लोकांना योग्य ती माहिती पुरवण्याचं काम करतात. त्यामुळे एकूणच असे म्हणता येईल की ज्याला मनापासून व्यवसाय करण्याची इच्छा आहे त्याला अनेक मार्ग सापडतात पण तिथ पर्यंत पोहचता आले पाहिजे.

5 comments: