Monday, October 1, 2012

Sunday, September 23, 2012

डाव्या व उजव्या सोंडेचा गणपती

डाव्या व उजव्या सोंडेचा गणपती 

प्रत्येक गणेशभक्त गणपती घेत असताना डाव्या व उजव्या सोंडेचा गणपती पाहून घेतो. त्यामागचे शास्त्र काय ते आपण या लेखात पाहू. डाव्या सोंडेच्या गणपतीकडे पहिल्यास चांगले वाटते. असा एक समज आहे, की सोंडेचे टोक उजवीकडे असलेली मूर्ती म्हणजे उजव्या सोंडेची मूर्ती आणि सोंडेचे टोक डावीकडे असणारी मूर्ती म्हणजे डाव्या सोंडेची, पण हे चूक आहे. सोंडेचे सुरवातीचे वळण कोणत्या बाजूकडे आहे. यावरून ठरवावे. गणेशमूर्तीतील सोंडेचे पहिले वळण जर उजवीकडे असेल व सोंडेचे तोंड डाव्या बाजूकडे वळलेले असेल, तरीही ती मूर्ती उजव्या सोंडेची आहे, असे समजावे.
उजवी सोंड :
उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती म्हणजे दक्षिणाभिमुखी मूर्ती. दक्षिण म्हणजे दक्षिण दिशा किंवा उजवी बाजू. दक्षिण दिशा यमलोकाकडे नेणारी, तर उजवी बाजू सूर्यनाडीची आहे. यमलोकाच्या दिशेला जो तोंड देऊ शकतो तो शक्‍तिशाली असतो. सूर्यनाडी चालू असलेला तेजस्वीही असतो.दक्षिणेला असलेल्या यमलोकात पाप- पुण्याची छाननी होते. म्हणून ती बाजू नकोशी वाटते.मृत्यूनंतर जशी छाननी होते, तसे मृत्यूपूर्वी दक्षिणेकडे तोंड करून बसल्यास छाननी होते.दक्षिणाभिमुख मूर्तीची पूजा नेहमी सारखी केली जात नाही. अशा मूर्तीची पूजा कर्मकांडातील पूजाविधीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून केली जाते. त्यामुळे सात्विकता वाढते व दक्षिणेकडून येणाऱ्या रजलहरीचा त्रास होत नाही.
डावी सोंड :
डाव्या सोंडेचा गणपती म्हणजे वाममुखी गणपती. वाम म्हणजे डावी दिशा किवा उत्तर बाजू. डाव्या बाजूला चंद्रनाडी आहे ती शीतलता देते. उत्तर बाजू आध्यात्माला पूरक आहे. आनंददायी आहे. म्हणून बहुधा वाममुखी गणपती पूजेत ठेवतात. याची पूजा नेहमीच्या पद्धतीने केली जाते.
डाव्या व उजव्या सोंडेचे महत्त्व पहिल्यानंतर आता गणेश पूजामध्ये पाहू वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट वस्तू.
1) दुर्वा : पूजनात दुर्वा विशेष महत्त्वाच्या आहेत. दू + अवम्‌ दू म्हणजे दूर असलेले व अवम्‌ म्हणजे जवळ आणते ते दूर असलेले गणेश पवित्रकांना जवळ आणतात. दुर्वा कोवळ्या असाव्यात दुर्वाना3,5, 7 अशा विषम संख्यांच्या पात्या असाव्यात. चेहरा सोडून सर्व गणपती दुर्वानी मढवावे. दुर्वाच्या वासाने गणपती पवित्रके आकर्षित होतात. वास टिकून राहावा म्हणून दुर्वा दिवसातून तीनदा बदलाव्या.
2) शमी पत्री : शमीमध्ये अग्नीचा वास आहे. पांडवांनी आपली शस्त्रे तेजस्वी राहावी म्हणून शमीवृक्षाच्या ढोलीत ठेवली.
3) मंदाराची पत्री : मंदराची फळे पांढरी असतात औषधात पारा जसे रसायन तसे मंदार हे वानस्पत्य रसायन आहे.
4) लाल वस्तू : गणपती वर्ण लाल. म्हणून लाल फुल, तांबडे वस्त्र, रक्‍तचंदन वापरतात. लाल रंग वातावरणातील पवित्रके मूर्तीकडे जास्त आकृष्ट होतात. मूर्ती जागृत व्हावयास मदत होते, पण गणपतीला लाल रंग आवडतो, असे सांगितले जाते. माहीत नसल्यामुळे.
5) मोदक : 21 दुर्वाप्रमाणे 21 मोदक नैवेद्य दाखवतात. मोदक म्हणजे आनंद. आनंदप्रदान करणारी शक्‍ती. मोदक ज्ञानाचे प्रतीक आहे. मोदकाच्या टोकाप्रमाणे आपले ज्ञानसुद्धा थोडे आहे, असे वाटते पण अभ्यास करू लागल्यावर समजते की खूप मोठे आहे. मोदक गोड तसाच ज्ञानाचा आनंदही गोड असतो

Monday, September 17, 2012

हरतालिकेची माहिती आणि कथा.....!!!

दक्षकन्या पार्वतीने आपल्याला मनाजोगता वर मिळवण्यासाठी केलेली उपासना म्हणजे हरतालिका व्रत होय. हिमालयाने आपल्या स्वरूपसुंदरी मुलीचा विवाह विष्णूशी करण्याचे योजिले होते. पण पार्वतीच्या मनात मात्र भोळा सांब वसला
होता. त्यामुळे पार्वतीने आपल्या आराध्याचे वाळूचे शिवलिंग स्थापून पत्री, फूल फळांनी त्याचे पूजन केले व त्याला प्रसन्न करून घेतले याकामी तिला तिच्या सखीचे सहकार्य लाभले.
म्हणजे बघा पूर्वीपासूनच एका पट्टमैत्रिणीला आपल्या मनातील सगळ्या गोष्टी सांगितल्या जात होत्या. त्यावेळी पित्याने ठरवलेल्या श्रीमंत वराला नाकारून आपल्या पसंतीच्या गरीबाशी (लौकिकार्थाने विष्णूपेक्षा शंकर साधेच!) लग्न करून त्याच्या बरोबर 'लंकेची पार्वती' बनून राहण्याचे धैर्य दाघवणारी उमा ही आजच्या समस्त स्त्री मुक्ती, स्त्री स्वातंत्र्य ह्या विचारांची उद्गातीच ठरते.
आजच्या काळातही जिथे अजूनही मुलीने पित्याच्या बोट दाखवलेल्या वराशी विवाह करण्याचाच आग्रह धरणार्‍या घरातून प्रेमविवाह म्हणजे 'अब्रह्मण्यम' तेव्हा ही या हिमगौरीने 'जब प्यार किया तो डरना क्या' ह्या ध्येयाने तिने शंकराला मिळवले.
आजच्या जमान्यातही आपल्या मनपसंत जोडीदाराला लग्नासाठी 'प्रपोज' करण्याचं धाडस किती जणीत असतं? उगीच पोकळ उसासे टाकत मनात झुरत सोन्याच्या पिंजर्‍यातील बंद मैना होण्यापेक्षा मोकळ्या रानातील राघूबरोबर त्याच्या हृदयाची स्वामिनी बनून राहण्यासाठी भरारी होण्याचे सामर्थ्य किती जणीत असते?

उमेने शंकराचे महत्त्व जाणले होते त्याच्या विरक्त वृत्तीवरच ती भाळली अन शेवटपर्यंत त्याच्या बरोबर कैलासावरच राहिली. लक्ष्मीप्रमाणे वैकुंठात रुसवे फुगवे केले नाहीत की आपल्या श्रीमंत माहेराचे गोडवे गायले नाहीत, बापाच्या घरून संपत्ती आणली नाही.
वास्तविक विष्णू त्यांच्या जातीचा (जात म्हणजे तरी काय एकाचप्रकारचे संस्कार, सांपत्तिक स्थिती याने निर्माण होणारे 'स्टेटस') त्याच्याशी लग्न करून ती सुखाने वैभवात लोळू शकली असती. मात्र, तिने स्वबळावर आणि आपल्या पतीच्या सामर्थ्यावर कैलासावर राज्य केले अन ती आदिमाता म्हणून गौरवली गेली. शंकराच्या तेजाने ती झाकोळली तर नाहीच पण उलट 'उमा-महेश्वरा'चा जोडा तर 'अर्धनारी नटेश्वर' म्हणून शोभला.
आजच्या काळातल्या मुलीच नव्हे तर स्त्रियाही हरतालिकेचे व्रत करतात अगदी निरंकार, रात्रभर जागरण करून व्रत करण्याची प्रथा उत्तरेकडे मोठ्या प्रमाणावर आहे. पण ते जागरण आपण योग्य गोष्टी करून, सत्कार्य करून किंवा किमान इतरांची कुचेष्टा न करता करतो का? उपवासाचा देवाच्या जवळ वास, त्याची आराधना हा उद्देश थोडाफार तरी साध्य होतो का? घरातील राजकारण त्या एका दिवशीही आपण थांबवतो का? हा विचार प्रत्येकीने करायला हवा.
सुरवातीला ज्या गुणावर भाळून आपण 'त्या'च्याशी लग्न केले नंतर तोच भांडणाचा मुद्दा का होतो? नवर्‍याची निस्पृहवृत्ती पाहून लग्न करणारी, नंतर तीच त्यालाच लाच घेण्यास प्रवृत्त करते असं का? आजच्या काळात जर स्त्रीने ठरवले तर भ्रष्टाचार बंद होईल. फक्त त्याची सुरवात प्रत्येकीने घरापासून करावी.
माझा तुझा नातेवाईक, मित्र-मैत्रीण असा भेद न करता जर योग्य व गरजू माणसाला मदत करण्याचा गुण मनाचा कोतेपणा कमी करून थोडासा वैचारिक, सामाजिक विचार प्रत्येकीने केला तर समाजात शांतता, प्रस्थापित होईल. उन्नती व विकास होईल. टाळी एका हाताने वाजत नाही पार्वतीला 'शिव' मिळाला तसाच प्रत्येकीला योग्य जोडीदार व महेश्वराला 'उमा' मिळाली तशी प्रत्येकाला सुज्ञ व धोरणी पत्नी मिळाली तरच जोडा शोभून दिसतो.
चांगलं माणूस मिळत नसतं ते व्हावं लागतं. अनुभवाने, सहवासाने, चांगल्या वाचनाने, चांगल्या आचरणाने मनातली किल्मिष काढून सहजीवन जगल्यास प्रत्येक जोडी आदर्श होऊ शकते. दोघांनी वादात एकेक पाऊल मागे जावे, सामंजस्य, योग्य सुधारणांत वाईट प्रथा सोडण्यात एकेक पाऊल पुढेच राहिले तर आपल्याबरोबर समाजही सुधारेल.
हे सणवार व्रत वैकल्य जोखड, जबाबदारी किंवा बोजा न वाटता त्यातून आत्मशुद्धी, आत्मिक उन्नती साधली तरच त्याचा खरा उद्देश्य साध्य होईल.

Sunday, September 16, 2012

स्पर्धा परीक्षा गुणवत्ता शोध अभियान

स्पर्धा परीक्षांत करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ‘स्टील फ्रेम सिव्हिल्स इंडिया’ या संस्थेच्या माध्यमातून ‘स्टील फ्रेम स्पर्धा परीक्षा गुणवत्ता शोध अभियान’ राबविले जात आहे. २३ सप्टेंबर रोजी आयोजित सामायिक परीक्षेच्या माध्यमातून यूपीएससी आणि एमपीएससीसाठी प्रत्येकी ५० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना पुणे व दिल्ली येथे मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
स्पर्धा परीक्षा या प्रशासकीय सेवांशी निगडित असल्या तरी प्रशासनाचा थेट संबंध देशाशी संबंधित असलेल्या प्रश्नांशी, देशविकासाशी, देशसेवेशी असल्याने या परीक्षांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रशासनप्रणाली देशाच्या न्याय्य समाजिक- आíथक विकास व नियोजनबद्ध वाढीसाठी एक चौकट पुरविते. मात्र अजूनही या सार्वजनिक निर्णय प्रक्रियेचा सामाजिक चेहरा पुरेसा प्रातिनिधिक झालेला नाही. अल्पसंख्याक किंवा निरनिराळ्या जातीजमातींचा प्रशासनामध्ये न्याय्य वाटा असणे ही विकासाची व राष्ट्र उभारणीची पूर्वअट नसते. मात्र न्याय्य निर्णयप्रक्रिया ही राष्ट्राची सार्वकालिक गरज असते. ही संस्थेची भूमिका असून या शोध अभियानात ५० टक्के जागा अल्पसंख्याक उमेदवारांसाठी असतील.
ग्रामीण भागातील, निम्न आर्थिक - सामाजिक घटकांतील उमेदवार स्पर्धा परीक्षांकडे वळायचे प्रमाण फारच कमी आहे. या मागचे महत्त्वाचे कारण या परीक्षांविषयीची अपुरी माहिती, भीती, न्यूनगंड आणि गरसमज. MPSC परीक्षेचा अनिश्चित पॅटर्न व यूपीएससीचा बदललेला पॅटर्न यामुळेही ग्रामीण भागातील उमेदवारांत संभ्रम असतो तर पालक स्पर्धा परीक्षेविषयी निरुत्साही असतात. या परीक्षांत यश मिळविल्यानंतर कौतुक सोहळे होत असले तरी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आíथक, सामाजिक पाठबळाची नेमकी व्यवस्था आपल्या राज्यात नाही. मार्गदर्शन, गरजू-होतकरू उमेदवारांचा शोध, त्यांच्या नेमक्या गरजा जाणून त्यांना सहकार्य व मदतीची नेमकी व्यवस्था करण्यासाठी अनेक अंगांनी काम करणे गरजेचे आहे.    
विनाअनुदानित शिक्षणसंस्था सुरू झाल्यानंतर व्यावसायिक शिक्षणाची संधी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाली. गेल्या २५ वर्षांत आलेल्या आयटीच्या लाटेवर स्वार होताना मराठी मनावर डॉलरच्या झळाळीचे आकर्षण आणि त्याला दिलेल्या तथाकथित सृजनशीलतेच्या तत्वज्ञानाचा मुलामा याचाच प्रकर्षांने पगडा होता. डॉक्टरचे एप्रन आणि इंजिनीअरिंगच्या कॅपचे आकर्षण माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील पगाराचे मोठे आकडे यामुळे पालकवर्गही मुलांनी प्रशासकीय सेवांकडे वळावे, याबाबत उदासीन होता. मात्र, जागतिक मंदीच्या झटक्यानंतर चित्र थोडेसे बदलले आहे. कॉर्पोरेट जगताची चमक थोडी कमी झाली व सरकारी नोकरीतच सुरक्षितता आहे, अशी भावना वाढीस लागली. याचा स्पष्ट परिणाम नागरी सेवा परीक्षेच्या २०११च्या निकालावर ठळकपणे जाणवतो. महाराष्ट्रातून या वर्षी ९२ उमेदवार निवडले गेले. यंदा अंतिम यादीतील पहिल्या पंचविसातील बहुतेक उमेदवार आयआयटी, आयआयएम किंवा मेडिकलचे आहेत. महिन्याला लाखो रुपयांचा पगार देणाऱ्या नोकऱ्या नाकारून ते तरुण लोकसेवेकडे वळतात व टॉपही करतात, हे सिद्ध झाले.
सर्वात जास्त अंतर्मुख करणारी गोष्ट म्हणजे स्पर्धा परीक्षा देणारा, यूपीएससी/एमपीएससी करणारा म्हणजे रिकामटेकडा अशी भावना अजूनही सामान्यजनांपासून विद्यापीठ स्तरापर्यंत सार्वत्रिकपणे दिसून येते. पाच-सहा वष्रे बौद्धिक काबाडकष्ट उपसणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना आíथक पाठबळ देणारी यंत्रणा तर खूप दूर राहिली, मानसिक पाठबळााहेत. दुसऱ्या राज्यातील विद्यापीठाचे अभ्यासक्रम यूपीएससीच्या अभ्यासक्रमांच्या धर्तीवर बेतलेले असतात. त्यामुळे पदवी घेऊन बाहेर पडेपर्यंत विद्यार्थ्यांची बरीचशी तयारी झालेली असते. काही राज्यातील लोकसेवा आयोगांच्या परीक्षांचा पॅटर्न हा यूपीएससीच्या पॅटर्नसारखाच असल्याने विद्यार्थी एकाच वेळी केंद्र आणि राज्य दोन्ही आयोगाच्या परीक्षेची तयारी करू शकतात. इथे महाराष्ट्रात मात्र विद्यापीठ स्तरावरील शिक्षण, एमपीएससी व यूपीएससी या तीन वेगळ्या वाटा आहेत. दुसरीकडे स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या संस्थांनीही वस्तुनिष्ठ व व्यवहारी दृष्टिकोन बाळगून ‘मार्ग’दर्शन करणे गरजेचे आहे. ‘राष्ट्र उत्थाना’चा अतिरेकी आदर्शवाद आणि पूर्ण व्यवस्था बदलून टाकण्याचा अभिनिवेश या टोकाकडे विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यापेक्षा त्यांना ‘मध्यम मार्गावर’ घेऊन जाणे जास्त गरजेचे आहे. निसंशयपणे कुणाच्या उपयोगी पडण्याचे, सेवेचे समाधान आणि आपल्यापुरते का असेना, व्यवस्थेत काही बदल आणण्याची पॉवर अधिकारी पदातून मिळते, पण हे सगळे केव्हा तर यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर. मुळात आपल्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षा करण्याची क्षमता आहे की नाही, हे जोखून क्षमता नसल्यास त्याचे समुपदेशन करणे, त्याला योग्य निर्णय घेण्यात मदत करणे हे स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षकाची जबाबदारी/कर्तव्य ठरते. मात्र क्षमता असो वा नसो, प्रत्येक विद्यार्थ्यांला उन्हाळी, हिवाळी, व्यक्तिमत्त्व विकसनाची शिबिरे करायला लावून त्यात असला अभिनिवेश, आदर्शवाद भरवण्याचा ट्रेंड विद्यार्थ्यांसाठी पुढे घातक ठरू शकतो. क्षमता नसताना मानसिक, शारीरिक हालअपेष्टा सहन करून पाच-सहा वष्रे कष्ट करूनही हाती आलेल्या अपयशाने हे विद्यार्थी खचून जातात आणि अशा उद्ध्वस्त मनांच्या पुनर्वसनाचा विचारही कुठल्या चच्रेत येत नाही.
पाल्याला अधिकारी करायचे या चांगल्या भावनेतून पालक मार्गदर्शकाच्या शोधात असतात. आपसूकच जोरदार जाहिराती करणाऱ्या संस्थांकडे पालक-विद्यार्थी धाव घेतात. जास्त जाहिरात करणारी संस्थाच चांगली किंवा बुकस्टॉलमध्ये काऊंटरवर काम करणाऱ्या कामगारांनी सांगितलेले पुस्तकच चांगले अशा भावनिक भोळसटपणामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे, पुढेही व्हायची शक्यता आहे. उमेदवाराकडून भरभक्कम फी भरून घ्यायची, नंतर मार्गदर्शनाचा ‘दर्जा’ लक्षात आल्यावर उमेदवाराने पसे परत मागितले की त्याला चकरा मारायला लावायचे, अशा चक्रव्यूहात सापडलेले कितीतरी अभिमन्यू फक्त पुणे शहरातच सापडतील.
ही सर्व वस्तुस्थिती पाहता गुणवत्ता शोध अभियानाच्या माध्यमातून गुणवंत उमेदवारांसाठी दिल्ली, हैद्राबाद व मुंबईसह महाराष्ट्रातील १४ केंद्रांवर सामायिक परीक्षेचे आयोजन केले आहे. हा फक्त एका संस्थेचा उपक्रम न राहता, या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था व्यक्तींनी व्यावसायिकता बाजूला ठेवून कृतिशील होणे आवश्यक आहे. या अभियानाच्या प्रक्रियेविषयी संपूर्ण माहिती www.thesteelframe.com  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
उमेदवाराना योग्य मार्गदर्शन मिळावे, राज्य-केंद्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांना बसण्याचे प्रमाण वाढावे, यासाठी नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी सुरू केलेली ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची शासकीय चळवळ’ नुसती कौतुकास पात्र नाही तर भारतभर त्याचे अनुकरण व्हावे अशी आहे. दर महिन्याच्या पाच तारखेला पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात नामवंत तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान होते, त्याला हजारो उमेदवार उपस्थित असतात. ‘सेतू’अंतर्गत अभ्यासिका व ग्रंथालय सुरू केले गेले आहे. निवड परीक्षेद्वारे उमेदवार निवडून त्यांना प्रवेश दिला जातो. ‘सेतू’अंतर्गत चालणारे हे स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्र माझ्या मते भारतातले पहिले ठरावे. राज्यातील कोचिंग क्लासेसच नव्हे, शासनानेसुद्धा योग्य दखल घेऊन हा ‘परदेशी पॅटर्न’ राज्यभर राबवायला हवा. नागरी सेवा परीक्षांत मराठी टक्का वाढवण्याच्या दिशेने आवश्यक कृतिशीलता, तत्परता यांचे गांभीर्य कोणत्याच पातळीवर नाही, हीच मुळात गंभीर बाब आहे. यशवंतांचे कौतुक सोहळे वा मराठी टक्क्याच्या नावे चिंतेचा गळा काढणे, एवढेच त्यासाठी पुरेसे नाही. त्यापलीकडे जाऊन विचार आणि कृती करावी लागणार आहे. यशवंतांनी जी अडथळ्याची शर्यत पार केली, त्यातील अडथळ्याची उग्रता काही अंशी जरी कमी करता आली तर पुढच्या काळात प्रयत्नांचे पाऊल पुढेच पडेल.

Sunday, September 9, 2012

नवश्या गणपतीची माहिती

पेशवे कालीन ऐतीहासिक नवश्या गणपती मंदिर हे आनंदवल्ली येथील अत्यंत जागृत असे देवस्थान आहे. नवश्या गणपती हा नवसाला पावतो असा अनुभव हजारो भाविकांना आलेला आहे. ह्या मंदिराला तीनशे ते चारशे वर्षांचा इतिहास आहे.
इ.स. १७७४ मध्ये फाल्गुन महिन्यात राघोबा दादा व त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी ह्या मंदिराची स्थापना केली होती. श्रीमंत माधवराव पेशवे यांचे आनंदवल्ली हे गाव आजोळ होते व त्यांच्या मातोश्री गोपिकाबाई ह्या देखिल नवश्या गणपतीच्या अत्यंत भक्त होत्या.
राघोबा दादा व आनंदीबाई ह्यांना १५ ऑगस्ट १७६४ रोजी मुलगा झला व त्याचे नाव विनायक असे ठेवण्यात आले. ह्या मुलाच्या जन्मप्रित्यर्थ चावंडस गावाचे नाव बदलून आनंदवल्ली असे ठेवण्यात आले. ह्याच दरम्यान नवश्या गणपतीच्या मंदिराची उभारणी सुरु झाली. गोदावरीच्या तीरी पुर्वाभिमुख असलेल्या ह्या मंदिरात प्रसन्न अशी श्री गणेशाची मुर्ती आहे.
मुर्तीचे डोळे अतीशय सजीव असून मुर्ती आकर्षक आहे. ह्या गणेशाला चार हात असून त्यात पाश, मोदक, फूल आहे व चौथा हात आशीर्वाद दर्शविणारा आहे. प्रत्येक हातात कडे आहे. मूळ मुर्तीच्या डोक्यावर मुकूट आहे.
राघोबा दादांनी आनंदवल्ली येथे राजवाडाही बांधला होता, राजवाड्यात पश्विमेस उभे राहिल्यावर श्री नवश्या गणपतीचे दर्शन होत असे. १८१८ साली इंग्रजांनी पेशवाई बुडवली व राजवाडा जाळून टाकला. मात्र परीसरातील मंदिरे शाबूत राहिली. श्री नवश्या गणपती मंदिर हे पेशव्यांच्या करकिर्दीची साक्ष देत आजही दिमाखाने उभे आहे.

Friday, September 7, 2012

प्रेम आणि वेडेपणा एक अप्रतिम कथा

खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे. जगाची उत्पती त्यावेळी झाली नव्हती आणि
मानवाने या जगात आपले पाऊल रोवले नव्हते. त्यावेळी सगळे सद्गुण आणि
दुर्गुण इकडे तिकडे फिरत होते. काय करावे हे न कळल्
याने कंटाळले होते.
एक दिवस ते सगळे एकत्र जमून काय करावं याचा विचार करू लागले. त्यांना
खूपच कंटाळा आला होता. इतक्यात 'कल्पकते' ला एक कल्पना सुचली. ती
म्हणाली, "आपण सगळे लपंडाव खेळूया का?" सर्वाना ती कल्पना एकदम आवडली.
लगेच वेडा असणारा 'वेडेपणा' ओरडला, "मी आकडे मोजतो". या वेडेपणाच्या मागे
लागण्या एवढं कुणी वेडं नसल्याने सर्वांनी त्याच्या म्हणण्याला मान्यता
दिली. 'वेडेपणा' एका झाडाला रेलून उभा राहिला आणि मोजू लागला,........
एक, दोन, तीन..............
वेडेपणाने आकडे मोजायला सुरुवात करताच सर्व सद्गुण व दुर्गुण
लपायला गेले. 'कोमलता' चंद्रकोरीच्या टोकांवर जाऊन बसली. 'देशद्रोह'
कचऱ्याच्या ढिगात लपला. 'आपुलकी' नं स्वताला ढगांमध्ये गुंडाळल.
'खोटेपणा' म्हणाला कि 'मी दगडाखाली लपेन'. पण त्याचं सांगणं खोटंच होतं.
प्रत्यक्ष तो एका तळ्याच्या तळाशी लपला. 'वासना' पृथ्वीच्या मध्यभागी
लपली. 'लोभ' एका पोत्यात शिरू लागला आणि शेवटी ते पोतं त्यानं फाडला.
वेडेपणा आकडे मोजतच होता...... ७९, ८०, ८१, ८२......
बहुतेक सगळे सद्गुण, दुर्गुण वेगवेगळ्या ठिकाणी लपले होते. अजून
'प्रेम' मात्र कुठे लपाव याचा निर्णय न घेता आल्याने लपू शकलं नव्हतं.
अर्थात आपल्याला याचं आश्चर्य वाटायला नको. कारण आपल्याला माहित आहे कि,
'प्रेम' लपवता येतचं नाही. 'वेडेपणा' आकडे मोजत होताच... ९५, ९६, ९७....
शेवटी शंभरावा आकडा उच्चारण्याची वेळ आली तेव्हा घाईघाईने 'प्रेमा' ने
एका गुलाबच्या झाडत उडी मारून स्वताला लपवलं. वेडेपणा ओरडला. "मी येतोय!
मी येतोय!"
'वेडेपणा' न सर्वांना शोधायला सुरुवात करताच आधी लगेच त्याच्या
पायाशीच त्याला 'आळशीपणा' सापडला. कारण स्वताला लपवण्या एवढा उत्साह आणि
शक्ती त्याच्यात नव्हती. नंतर त्याला चंद्रकोरीवरची 'कोमलता' दिसली.
तळ्याच्या तळातून त्याने 'खोटेपणा' ला शोधले. पृथ्वीच्या मध्यभागातून
'वासना' शोधून काढली. एकापाठोपाठ एक सगळे शोधले, पण त्याला एकाचा शोध
लागेना. त्या एकाला शोधता येईना म्हणून 'वेडेपणा' निराश झाला. तेवढ्यात
'मत्सरा' ने, त्याला शोधता येत नाही या मत्सराने ग्रस्त होऊन त्या
'वेडेपणा' ला म्हटले, "अरे, तुला 'प्रेम' सापडत नाहीये. ते त्या
गुलाबाच्या झुडुपामागे लपलंय".
'वेडेपणा' ने एक लाकडाचा धारदार ढलपा
घेतला आणि गुलाबाच्या झुडुपात तो भोसकला. एकदा..... दोनदा.... अनेकदा.
शेवटी एक हृदयद्रावक किंकाळी ऐकू आली तेव्हा तो थांबला. त्या किंकाळीनंतर आपल्या चेहऱ्यावर हाथ झाकीत 'प्रेम' बाहेर आलं. त्याच्या बोटांच्या फटीतून रक्त ओघळत होतं. प्रेमाला शोधण्याच्या अधिर्तेमुळे 'वेडेपणा' ने
त्या लाकडी ढलप्यान प्रेमाच्या डोळ्यांवर वर केले होते. वेडेपणा आक्रोश करू लागला, "अरेरे! मी हे काय केलं? काय केलं मी? मी तुला आंधळा करून टाकलं. आता मी याची भरपाई कशी करू? तुझे डोळे आता पूर्वीसारखे कसे करू? प्रेम म्हणाले, "तू काही माझे डोळे परत देऊ शकणार नाहीस. पण तुला जर माझ्यासाठी काही करायचंच असेल तर तू माझा मार्गदर्शक हो. मला रस्ता

Thursday, September 6, 2012

छत्रपती शिवाजी महाराज



हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना अलेक्झांडर ते नेपोलियनपर्यंतच्या अकरा जागतिक योद्ध्यांशी करून छत्रपती शिवराय हे विविध पैलूंनी आणि उदाहरणांवरून एक अद्वितीय पुरुष असल्याचा संशोधनात्मक निष्कर्ष जागतिक इतिहासावर प्रदीर्घ अभ्यासानंतर डॉ. हेमंतराजे गायकवाड यांनी इंग्रजी आणि मराठीत मांडला आहे. यावर विविध देशांमध्ये इतिहास अभ्यासकांमध्ये नव्याने चर्चा सुरू झाली असून त्यावरील भाष्य..
.
दिल्लीच्या मोगल घराण्याचा सहावा बादशहा औरंगजेब, फ्रेंचच्या क्रांतिकारकांचा नेता नेपोलियन, स्कॉटलंडचा कट्टर देशभक्त, लढाऊ विलियम वॉलस्, रोमचा साम्राज्याचा सामर्थ्यशाली ज्युलिअस सीझर, रोमन सैन्यांतील गुलामांचा नेता स्पाटीकस, वयाच्या २७व्या वर्षी कार्थेजचा सेनापती झालेला हानीबाल, फ्रान्सचा आंदोलक रिचर्ड द लायन हार्ट, अचूक लक्षवेधांसाठी प्रसिद्ध असलेला ‘हून’चा ऍटिला, स्वीडीश साम्राज्याचा महाशक्तीशाली ऍडॉल्फस गस्टावस, मंगोलियाचा कत्तलकिंग चिंगीझ खान आणि मॅसिडोनियाचा जगप्रसिद्ध सम्राट सेनानायक अलेक्झांडर द ग्रेट या अकरा जागतिक स्तरावरील योद्ध्यांमध्ये वस्तुनिष्ठ कसोट्यांवर पारखून पाहता आपले शिवाजी महाराज शंभर नंबरी सोने आहे. शिवाय इतिहासाच्या दालनात लखलखणारा चौसष्ट पैलूंचा स्वयंप्रकाशी हीरा आहे.
कोणत्याही दोन ऐतिहासिक व्यक्तींची तुलना हुबेहूब जुळणे शक्य नाही. तथापि, अशा तुलनेपासून वर्ण्य व्यक्ती मनात ठसण्यास मदत होते. शिवाजी महाराज अनेक बाबतींत लोकोत्तर पुरुष होऊन गेले. त्यांनी आपल्या राष्ट्राचे गुणावगुण बरोबर ओळखून लोकांचा स्वाभिमान जागृत केला आणि त्यांची एकी करून त्यांस नानाविध पराक्रम करण्यास उद्युक्त केले. शिवाजींपेक्षा जास्त पराक्रम गाजविणारे किंवा जास्त देश जिंकून त्यांच्यावर राज्य करणारे पुरुष इतिहासात पुष्कळ आढळतील. पण त्यांच्याइतका गुणसमुच्चय एका व्यक्तींत एकत्रित झालेला सहसा आढळत नाही. फार काय शिवाजी महाराजांत अमुक एक दोष दाखवा असा प्रश्‍न कोणी केल्यास आपणास बहुधा निरुत्तर व्हावे लागते. या सर्वांमध्ये साम्य बरेच आहे. निष्ठा व कल्पक बुद्धी, लोकांवर छाप बसविण्याची विलक्षण हातोटी, राष्ट्र उर्जितावस्थेत आणण्याची अनावर उत्कंठा इत्यादी महान पुरुषांस अवश्यमेव लागणारे गुण सर्वांमध्ये बसत होते.
द्वंद्व : अलेक्झांडर, सीझर, हानीबाल, ऍटिला, रिचर्ड, चिंगीझ खान, ऍडाल्फस, अकबर, औरंगजेब व नेपोलियन या सर्वांनी आपल्या बलाढ्य व शक्तिशाली सैन्यांच्या आधारावर घनघोर युद्धे केली. पण यापैकी कुणीही शिवाजी महाराजांनी अफझलखानाविरुद्ध जसे द्वंद्व युद्ध केले तसे ‘वन टू वन’ (द्वंद्व) केले नाही. इतिहासाचा अभ्यास केल्यावर असे लक्षात येते की बहुधा सर्व राजे-महाराजे हत्तींवर आरुढ होऊन रणांगणापासून दूर एखाद्या टेकडीवरून युद्धाची पाहणी करीत असत. रणांगणातील रक्ताचे शिंतोडेसुद्धा काहींच्या अंगावर कधीही उडाले नाहीत.

थर्मोपिली : अलेक्झांडर, सीझर, हानीबाल, ऍटिला, रिचर्ड, चिंगीझ खान, ऍडाल्फस, अकबर, औरंगजेब व नेपोलियन यांनी युद्धांमध्ये भाग घेतला. रणांगणांतील घनघोर युद्धांचे यश हत्ती, घोडे, उंट, तोफा, बंदुकी, सैन्यसंख्या, सेनापतींची रणनीती इत्यादी बाबींवर अवलंबून असते. सर्व युद्धांमध्ये एक सारखेपणा पाहायला मिळतो. तुलनेने प्रचंड सैनिकी संख्याबळ व श्रेष्ठ दर्जाची युद्धसामग्री यांचा नेहमी विजय होत असतो. क्वचित सेनापतींची युद्धनीती व सैन्यांचे मनोबल युद्धाचे पारडे भारी करू शकतात. पण भूप्रदेशाचे ज्ञान कसे बाजी मारू शकते हे लिओनिडासने पहिल्यांदाच जगाला थर्मोपिलीच्या युद्धात दाखवून दिले. हेच धोरण स्वतंत्रपणे बाजीप्रभूने घोडखिंडीत अवलंबिले व शिवाजी महाराज आणि स्वराज्यासाठी आपले रक्त सांडून ती खिंड पावन केली. थर्मोपिलीसारखी लढाई कोणत्याही योद्ध्याने केली नाही. फक्त शिवाजी महाराजांनी केली.

स्मारके : अलेक्झांडर, सीझर, हानीबाल, ऍटिला, रिचर्ड, चिंगीझ खान, ऍडाल्फस, अकबर, औरंगजेब व नेपोलियन या सर्वांनी नवी शहरे, मशिदी व महाल स्वत:च्या गौरवासाठी उभारले.याउलट शिवाजी महाराजांना असे करण्याची अमाप संधी होती. पण त्यांनी स्वत:च्या नावाने शहर किंवा किल्ला बांधला नाही. तसेच त्यांनी कोणत्याही शूर मावळ्याचे नाव एखाद्या वास्तूलासुद्धा दिले नाही. कारण शिवाजी महाराजांच्या दृष्टीत सर्व मावळे समान पराक्रमी होते.

सरेआम कत्तल : अलेक्झांडर, सीझर, हानीबाल, ऍटिला, रिचर्ड, चिंगीझ खान, अकबर, औरंगजेब या सर्वांनी सरेआम कत्तल केली. चिंगीझ खानाने ग्रेन्चच्या युद्धात जगातील सर्वात जास्त बिनयांत्रिक कत्तल केली. ऍटिलाच्या क्रौर्यामुळे त्याला ‘स्कर्ज ऑफ गॉड’ (देवाचा चाबूक) म्हटले जात असे. याच्याविरुद्ध आपण सुरतेच्या मोहिमेत पाहिले आहे की, अगदी तीव्रपणे डिवचले गेल्यावरसुद्धा शिवाजी महाराजांनी आपला तोल सुटू दिला नाही व सरेआम कत्तलीची घोषणा केली नाही. म्हणूनच इतिहास त्यांना ‘जिनावा संकेत’चे जनक म्हणू शकतो.

कैद : या योद्ध्यांपैकी फक्त चिंगीझ खान, रिचर्ड व सीझरला कैद झाली. चिंगीझ खान त्या वेळेस फार लहान होता व त्याने पाच वर्षांची कैद मुकाट्याने भोगली. रिचर्ड व सीझरने रीतसर खंडणी देऊन स्वत:ची सुटका करू घेतली. वॉलसलाही फितुरीने पकडले गेले व देशद्रोहाच्या आरोपावरून मृत्युदंड दिला गेला. शिवाजी महाराज हे एकुलते एक योद्धे आहेत ज्यांना आमंत्रण देऊन त्यांना आग्य्रााला बोलावले गेले व सन्मानाऐवजी नंतर कैद फर्माविली गेली. ते स्वत: तर निसटलेच पण त्यांचे १५०० साथीदारसुद्धा सुरक्षितपणे मायदेशी परतले. हे पलायन जगातील सर्वात धक्कादायक पलायन आहे. नेपोलिअनला दोन वेळा कैद झाली. पहिल्यांदा तो एल्बाहून निसटला. पण सेंट हेेलेनामधून तो निसटू शकला नाही व तेथेच त्याचा मृत्यू झाला.

बंड : शिवाजी महाराजांविरुद्ध कधीही बंड झाले नाही. त्यांनी स्वराज्याची ज्योत अशा प्रकारे प्रज्ज्वलित केली होती की ते आग्य्रााच्या नजरकैदेत असतानासुद्धा स्वराज्यातील एकही सरदार फितूर झाला नाही. अपवाद फक्त संभाजीचा जो पूर्वी आपण पाहिलाच आहे.

नवीन युद्धनीती : सर्व योद्ध्यांनी संपूर्ण समाजाची सुधारणा करून स्वतंत्र आरमाराची स्थापना करण्यासारखे कार्य केले नाही. ते शिवाजी महाराजांनी केले. त्याच तोडीचे नसले तरी तसे एक कार्य म्हणजे हानीबालने आल्पसच्या बर्फाच्छादित शिखरांवरून आपले गजदल इटलीत उतरविले. ‘गनिमी कावा’ या युद्धनीतीचे श्रेय जग महाराजांना देते.
‘शिवाजी महाराज हे सार्वकालीन सर्वश्रेष्ठ राज्यकर्ते होते’, या मताशी सारेजण सहमत असतील. तसेच ‘शिवाजी महाराज हे व्यक्ती म्हणूनसुद्धा आजपर्यंतच्या ज्ञातमानवी इतिहासातील सर्वश्रेष्ठ मानव आहेत’ हे महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापनही उभं जग, संशोधक, अभ्यासक मान्य करतील.